म. ए.सो. फडके विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी घेतले युवा चेतना शिबीर….

म.ए.सो.फडके विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक दहा ते बारा मे दरम्यान युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी हे शिबिर घेतले. समाजभान ,तंत्रज्ञान, कलामनोरंजन यांची गुंफण या शिबिरात करण्यात आली.
युवावस्थेतील मुले आपल्या ताई दादांशी जास्त सहजतेने संवाद साधतात हे जाणून सदर शिबिर माजी विद्यार्थ्यांमार्फत घेण्याचे विद्यालयाने ठरवले आणि माजी विद्यार्थ्यांनीही या कल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिनांक 10 मे रोजी मुख्याध्यापिका मानसी वैशंपायनयांच्या हस्ते या शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले. शिबिराची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली. त्यानंतर शिबीर घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यात आला नंतर मुख्याध्यापकांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला या शिबिरामध्ये माजी विद्यार्थी मयुरी धुमाळ हिने जेंडर सेन्सिटिव्हिटी ,लेखन कौशल्य अशी दोन सत्रे घेतली, अथर्व गोखले या उदयन्मुख कलाकाराने अॅक्टींग वर्क शॉप, स्नेहा खोपडे हिने क्विलिंग व मंडला आर्ट, कुणाल मानकामे याने सोशल अॅक्टिविजम फॉर पॉवर ऑफ युनिटी, प्राजक्ता चव्हाण हिने लाईन डूडलींग तर सौरभ कर्वे यांनी ॲपलिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी प्लेटफार्म अशी विद्यार्थ्यांना समृद्ध करणारी सत्रे घेतली. तर या शिबिराचा समारोप म.ए.सो.व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या समन्वयक गिरीजा लिखिते यांच्या ध्येयनिश्चिती या सत्राने झाला. पर्यवेक्षिका समिता सोमण यांनी व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या समन्वयक लिखितेमॅडम, त्यांच्या सहकाऱ्यांचे व ज्यांनी शिबीर घेतले त्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
सदर शिबिरामध्ये आठवी ते दहावीचे सुमारे 61 विद्यार्थी सहभागी झाले होते या शिबिराचे आयोजन सौ. बापट यांनी केले, तर सहकारी शिक्षिका सौ पाटील व सौ. इनामदार यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी त्यांना मदत केली.

Leave a Comment