छंदवर्ग

म .ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय
दिनांक २६एप्रिल ते १ मे या कालावधीत विदयालयाने इयत्ता ५वी ते ७वी च्या विदयार्थी वर्गासाठी छंदवर्गाचे आयोजन केले होते ,या उपक्रमात पनवेल सह इतर जिल्ह्यांच्या शाळेतील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . या उपक्रमात लहान मुलांसाठी विज्ञानातील गमती जमती दाखवणारे छोटे छोटे प्रयोग दाखवण्यात आले.मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा या करीता दररोज चित्रकला, कथाकथन , कागदकला, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे , योगासनासह विविध छंदवर्ग जोपासण्यात आले , फडके विद्यालयासह पुणे,ठाणे, डोंबिवली, ऐरोली, चिपळूण तेथील विद्यार्थ्यांना या lockdown काळात ऑनलाईन छंदवर्गातून लॉक केले.त्यामुळे पालक वर्गातून शाळेचे कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष विजय भालेराव ,डॉ. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन ,सहा.शिक्षिका अनुजा जोशी ,प्रिती धोपाटे, शशिकांत कुपटे, सुषमा ठाकूर ,अर्चना ढोले , विजया जाधव यांच्या द्वारे हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’