मुख्याध्यापक मनोगत

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे !

आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण देणाच्या  उद्देशाने १८६० साली  श्री . वामन प्रभाकर भावे , आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके , श्री लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी केली . आजही याच उद्देशाने आपली संस्था प्रगतशील यशस्वी वाटचाल करीत आहे . संस्थेचा एक घटक असलेली पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना २१ जून १९९९ साली करण्यात आली . कालानुरूप शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल झाले . या सर्व बदलांना   स्विकारून विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य असे वातावरण निर्माण करून शिक्षण देण्याचे कार्य संस्थेतील अनेक शाखांमार्फत होत आहे .

नुसत्या बुद्धिमत्तेपेक्षा व्यवहारिक जीवनातल्या कौशल्यांना, वागण्यात-बोलण्यातील कौशल्यांना जास्त महत्व आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणे , त्यामुळे तो किंवा ती स्वतःमधील चांगुलपणा जोपासू शकतील. जागतिक दर्जाचे ज्ञान विकसित करणे, निसर्गाबद्दल प्रेम आणि मित्र व मैत्रिणींबद्दल आपुलकी , तसच आजूबाजूच्या लोकांबद्दल सद्भावना वाढविणे हा योजनेचा एक भाग आहे .मुलांना सर्वोत्तम , दर्जेदार शिक्षण देणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

अकारण लादल्या गेलेल्या अभ्यासातून चढा ओढीने एखाद्या ठिकाणी पोहोचाण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचा एखाद्या वेगळ्या वाटेने झालेला प्रवास नक्कीच आनंददायी असेल .

मुख्याध्यापिका
नमिता जोशी

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’