शाळेची वैशिष्ट्ये

  • बनी टमटोला :- ३ते ६ वयोगातील शिशुविहार,बालवाडी,अंगणवाडी मधून आपल्या शालेय जीवनाला सुरवात करताना पर्यावरणातील बदल व आधुनिक तंत्रज्ञान यांचे ज्ञान व निरीक्षण याविषयी आत्मविश्वास मिळवून देणारा बनी टमटोला उपक्रम, २०१२ पासून सतत ७वर्षे यशस्वीरित्या सुरु आहे.
  • क्षेत्रभेटी :- शालेय अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती  मिळविण्याचा अनुभव देण्यासाठी क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते.
  • पालकशाळा :- पालकांच्या बालपणाची आठवण करून देण्यासाठी पालकशाळा
  • पर्यावरणपूरक सहशालेय उपक्रमांची रचना :- शाडूमातीच्या गणेशमूर्ती, कागदी पिशव्या बनविणे,दहीहंडी ,नागपंचमी,भोंडला, रक्षाबंधन, प्रदूषणविरहीत दिवाळी यासारख्या पर्यावरणस्नेही उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
  • ज्ञानदायी विषय कोपरे :- शालेय इमारतीमधील कोपरे विविध विषयांमधील मुलभूत संबोध, सूत्रे, व्याख्या यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनातून साकारले आहेत.
  • वर्गतुकड्यांचे वैशिष्ट्यपूर्ण नामकरण :- वर्गतुकड्यांना फुलांची, पर्वतांची, थोर महापुरुषांची प्रेरणादायी नावे देण्याच्या अभिनव कल्पनेमुळे शालेय वातावरण आनंददायी झाले आहे.
  • मुक्तांगण : – विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुक्तांगण या मासिकाचे प्रकाशन
  • सेमी इंग्रजीचा परिचय व पूर्वतयारी
  • बनी टमटोला (स्काऊट गाईड व कब बुलबुल यावर आधारित अभ्यासक्रम)
  • संस्कृत भाषेचा परिचय व त्याद्वारे सुस्पष्ट उच्चार व पाठांतरास पूरक उपक्रम
  • छोट्या छोट्या प्रयोगातून शिक्षण
  • शाडूच्या मातीपासून गणपती बनविणे
  • गोष्ट पाठांतरासाठी प्रत्यक्ष कृतीतून पपेटसद्वारे गोष्ट सांगणे.