मुख्याध्यापक मनोगत

 

 

 

 

सामर्थ्य  आहे शिक्षणाचे | जो जो उमजेल तयाचे |
परंतु तेथे राष्ट्रभक्तीचे | अधिष्ठान  पाहिजे ||

वि. वि. चिपळूणकरांच्या या विचारानुसार राष्ट्राची प्रगती ही शिक्षणाच्या गुणवत्तेवर  अवलंबून असते. आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण देणाच्या उद्देशाने १८६० साली श्री. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी केली. आजही याच उद्देशाने आपली संस्था प्रगतशील यशस्वी वाटचाल करीत आहे. संस्थेचा एक घटक असलेली पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाची स्थापना २१ जून १९९९ साली करण्यात आली. कालानुरूप शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल झाले. या सर्व बदलांना स्विकारून विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य असे वातावरण निर्माण करून शिक्षण देण्याचे कार्य संस्थेतील अनेक शाखांमार्फत होत आहे.

मुलांच्या डोक्यात काही कोंबणे हे शिक्षण नव्हे. मुल जन्माला येताना ज्या क्षमता बरोबर घेऊन येते त्या क्षमतांचा विकास करणे हे खरे प्राथमिक शिक्षण होय. हा विकास साधण्यासाठी विद्यालयातील प्राथमिक स्तरावर अनेक कृतिशील अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घेऊन उपक्रमांचे उद्दिष्ट सफल केले जाते. एकूणच सर्व उपक्रमांकडे समाजाने सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य केले तर राष्ट्रात नवचैतन्य व नवसामर्थ्य दिसू शकेल.

मुख्याध्यापिका
निशा देवरे

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’