मुख्याध्यापक मनोगत

मनःपूर्वक शुभेच्छा !! 

विद्यालयाने दि . २१ जून २०२३ रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, आपणा सार्वांना खूप शुभेच्छा !!

१८६० साली राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कटिबध्द झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील  सुमारे एकशे साठ वर्षांची प्रदीर्घ वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरा बरोबरच,’ एज्युकेशन हब म्हणून’ नव्याने विकसित होत असलेल्या नव्या मुंबईत संस्थेचे आद्य संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृती वास्तूरुपाने चिरंतन ठेवण्यासाठी नवीन पनवेल येथे १९९९ मध्ये विद्यालयाची स्थापना झाली.

भविष्याचा वेध घेणारे संस्थेचे कल्पक व कुशल नेतृत्व, शैक्षणिक बदलांना सामोरे जायची तयारी, समर्पित भावनेने ज्ञानदानाचे व्रत आचारणाऱ्या म. ए.सो. च्या विद्या व्रतीनी पनवेल येथे हा ज्ञानयज्ञ सुरू केला.

अवघ्या ३५० विद्यार्थ्यांसह आपल्या वाटचालीस सुरुवात करत अल्पावधीत विद्यालयाने परिसरात नावलौकिक  मिळवला व विद्यार्थी संख्येचा आलेख चढता ठेवला.

काळाची पावले ओळखून  संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेमी इंग्रजी माध्यम, इंग्रजी संभाषण कौशल्य विकसन वर्ग, संस्कृत संभाषण वर्ग या सारखे अनेक उत्तम व विद्यार्थी कल्याणकारी उपक्रम विद्यालयात यशस्वी पणें सुरू आहेत.

समाजातील शिक्षण विषयक आस्था असलेल्या, उदार आणि सेवाभावी आस्थापना कडून मिळालेल्या मदतीमुळे विद्यालयात डिजिटल क्लास रूम्स चे स्वप्न साकार झाले  आणि  लवकरच सोलर पॅनल कार्यान्वित होत आहेत.  दि २१ जून २०२३ ते २१ जून २०२४ हे वर्ष विद्यालय आपले रौप्य महोत्सोवी वर्ष साजरे करीत आहे.

विद्यार्थी, पालक, शिक्षक व सह शालेय घटक, समाज आणि अर्थातच म.ए.सो.चे मार्गदर्शन या मुळे विद्यालयाचा संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगतीचा आलेख चढता राहील व भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यां चे राष्ट्र मन येथेच घडेल असा विश्वास वाटतो.

मुख्याध्यापिका
समिता सोमण