अभिमानास्पद!!! मराठी माध्यमिक विभाग

*रायगडमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या फडके विद्यालयाच्या पनवेल कन्येचा गौरव*

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इ. ८ वीच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत सर्वप्रथम स्थान मिळविलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल स्थित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील कु. अवंतिका सुनिल टकले हिला महिला व बालकल्याण खात्याच्या रायगड जिल्ह्यातील मा . कॅबिनेट मंत्री, आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात गौरविण्यात आले . याप्रसंगी रायगड जिल्हाधिकारी मा. जावळे साहेब उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात आपल्या पनवेल तालुक्याला हा सन्मान मिळवून दिल्याबद्दल पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. मोहिते यांनी अवंतिका व शाळेच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांचे अभिनंदन केले आहे.
पनवेल कन्या अवंतिका सुनिल टकले हिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

https://photos.app.goo.gl/XiCuq2sY96gzwfw36

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’