*”चाकोरीबद्ध शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या पर्यायांची माहिती घ्या”*
पनवेल येथील म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमात आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यालयाचा माजी विद्यार्थी व प्रथितयश फोटोग्राफर केदार कोशे हा “नव्या वाटा” या मुलाखतीत ते बोलत होते.
नवीन व्यावसायिक वाटा निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी केदार कोशे यांना विद्यालयात निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “आज असंख्य नवीन क्षेत्रं निर्माण झाली आहेत, त्यांची माहिती घ्या. मेहनत करा पण संयम ठेवा. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला तरी आपलं वेगळेपण सिद्ध करा.” विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांचा प्रवास उलगडून सांगितला. लग्न समारंभात फोटोशूट करताना घडणाऱ्या गमतीजमती सांगितल्या. फोटोग्राफी क्षेत्रातील त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणाले ,” आपल्या क्षेत्राची अद्ययावत माहिती मिळवा, तज्ञांना भेटा, नवीन प्रयोग कराल तरच यश मिळेल.”
केदार कोशे यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.