आषाढी एकादशी [ प्राथमिक मराठी माध्यम ]

आषाढी एकादशी
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी , भारतीय सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच वारकरी संप्रदायाची ओळख होण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त पनवेल परिसरातील आदई गावातील श्रीकृष्ण मंदिर व विठ्ठल मंदिरात दिंडीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे बसव्यवस्थापक श्री. संतोष काकडे व श्री. विश्वनाथ फडतरे यांच्या बससेवेच्या मदतीने इयत्ता तिसरी व चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पनवेल परिसरातील आदई गावातील श्रीकृष्ण मंदिर व विठ्ठल मंदिरात वारकरी पोशाखात तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन हातात टाळ व चिपळ्या तसेच भगवे ध्वज घेऊन आनंदात विठ्ठल नामाचा गजर करत मंदिराचे व्यवस्थापक, सर्व ग्रामस्थ तसेच भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या महिला या दिंडीमध्ये समाविष्ट झाल्या.
गावातील सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळा व संस्थेतर्फे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे यांनी स्वागत केले .मांगल्याचे प्रतीक श्रीफळ व मायेची उब देणारी शाल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ. मनीषा कांडपिळे यांनी केले. संगीत शिक्षिका अंकिता थवई व बालगोपाळांनी विठूचा गजर, गवळण, अभंग वाद्याच्या साथीने सादर केले. सर्व ग्रामस्थांनी व मंदिर व्यवस्थापक तसेच भाग्यलक्ष्मी महिला बचत गटातर्फे सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागासाठी कौतुक केले . इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयाच्या सभागृहात विठ्ठल रखुमाईचे पूजन करून व हरिनामाचा गजर करत शालेय सभागृहात दिंडीचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे आनंदमय वातावरणात आषाढी एकादशीचा कार्यक्रम संपन्न झाला.

https://photos.app.goo.gl/DpMpGbsufwArpyrg7

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’