रक्षाबंधन पूर्व प्राथमिक विभाग

रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला श्रावण
लाख लाख शुभेच्छा
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण..
अशाप्रकारे बहिण भावाचे नाते अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा होय. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व हातावर राखी बांधली विद्यार्थ्यांनी भेट स्वरूपात विद्यार्थिनींना छोटेसे एक रोपटे भेट दिले. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील झाडाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने वृक्ष बंधन साजरे केले त्यासाठी वृक्ष लागवड करूनत्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे हा संदेश दिला.असा हा आगळावेगळा उपक्रम मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाला.

https://photos.app.goo.gl/UXn1xZAYMawLmai5A

Leave a Comment