आषाढी एकादशी विद्यालयात उत्साहात साजरी

म.ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय,न.पनवेल
(माध्यमिक विभाग- मराठी माध्यम)
*आषाढी एकादशी उत्साहात संपन्न*
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन.
मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण व सांस्कृतिक प्रमुख सौ. स्वाती बापट यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्ती गीते, नृत्य ,अभंग ,भारुड सादर केली. टाळ-मृदंगाच्या नादात “विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला” या भक्तिगीताने संपुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले . आषाढी एकादशीची माहिती, महिमा सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावा, यासाठी सहाय्यक शिक्षिका सौ. अश्विनी इनामदार यांनी माहिती कथन केली. यामध्ये प्रामुख्याने या वारीची परंपरा, संतांचा महिमा, विठूनामाची महती, वारकरी संप्रदाय, त्यांची भक्ती, श्रद्धा, विश्वास इ. चा समावेश होता. यावेळी संपूर्ण वातावरण विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले होते.
मा. मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी आरती व अभंगाचे गायन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १०वी राजा शिवाजी मधील कु. भार्गवी जोशी, कु. राजसी भिडे, कु. गौरी भालेराव कु. मृणाल भागवत यांनी केले होते.

https://photos.app.goo.gl/sq6aqJRwkUvZptdC6

Leave a Comment