शुभास्ते पंथान: … निरोप नव्हे शुभेच्छांचा वर्षाव*
बुधवार दि .३१ जानेवारी २०२५रोजी म. ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात “शुभास्ते पंथान:” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
‘निरोपाचा क्षण नाही,शुभेच्छांचा वर्षा आहे,
पाऊल बाहेर पडताना,रेंगाळणारे मन आहे.’
या उक्ती प्रमाणेच माध्यमिक शालान्त परीक्षेस प्रविष्ट होऊन, आपल्या शालेय जीवनाचा अंतिम टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांचा ‘निरोप समारंभ’ न करता त्यांना त्यांचा भविष्यातील प्रवास,’ पथ’.. ..’वाट ‘शुभंकर होवो अश्या आशीर्वादरुपी शुभेच्छा देणारा शुभास्ते पंथानः हा विद्यालयाचे वेगळेपण जोपसणारा कार्यक्रम .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ . सोमण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
“आत्मविश्वास व प्रयत्न हीच विद्यार्थी जीवनातील महत्वाची शक्तिपीठे आहेत. सातत्याने पण नियोजनबद्ध अभ्यास करून सुयश संपादन करा ” असे शुभाशीर्वाद दिले.
या वेळी इयत्ता १०वी तील काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या शालेय जीवनातील आठवणीचा पट व्हिडिओ रूपाने इयत्ता दहावी राणी लक्ष्मीबाई व इयत्ता दहावी राजा शिवाजी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उलघडला,तसेच, जेसीका,नेहा गायकवाड व वैष्णवी मदने या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेमध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ . सोमण यांनी आयुष्यातील या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . कु .गौरी भालेराव, प्रांजल सरक, श्रेया गुळवणी या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आशयपूर्ण ध्येयगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.