क्षेत्रभेट

शनिवार दिनांक १८ मार्च रोजी भूगोल विषयांतर्गत इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.त्यात इयत्ता ५वी ते ७वी चे विद्यार्थी तळोजा येथे सकाळ पेपर्सच्या प्रेस मध्ये क्षेत्रभेटीला गेले होते. विद्यार्थ्यांनी पेपरची छपाई कशी होते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.८वी व ९वी चे विद्यार्थी युसुफ मेहर अली सेंटर तारा याठिकाणी क्षेत्रभेटीला गेले होते. याठिकाणी साबण कारखान्यात साबण कसा तयार होतो, मातीच्या वस्तू कशा पद्धतीने तयार केल्या जातात, तेलाच्या घाणीतून तेल कशा पद्धतीने काढले जाते, तसेच गांडूळ खत तयार करण्याची पद्धत या सगळ्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. दोन्ही क्षेत्रभेटी खूप छान झाल्या. विद्यार्थी भूगोल विषयाअंतर्गत या क्षेत्रभेटींची वर्गनिहाय PPT तयार करून सादरीकरण करणार आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थी याचा अहवाल लिहिणार आहेत.

https://photos.app.goo.gl/LDD3xNkhwCoQ6rHn9

 

Leave a Comment