दिनांक ४ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सत्रातील गणित उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन व गणित सूत्र लिहिले बुकमार्क्स तयार करणे यांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सोमण मॅडम यांनी केले .यात विद्यार्थ्यांनी कोन व कोनाचे प्रकार,संख्यांचे वर्ग,संख्यांचे घन,पाढे तयार करणे,मॅजिक बाॅक्स, विविध सूत्र लक्षात ठेवण्यासाठी ची प्रतिकृती,अपूर्णांक ओळख अशा गणितीय संकल्पनांवर आधारित *शैक्षणिक साहित्य* तयार केले.
तसेच प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांने गणितातील एक गणितीय सूत्र लिहिलेले *बुकमार्क* तयार केले. ज्यावर वर्ग,पाढे,घन,परिमिती,क्षेत्रफळ, बैजिक राशीचे सूत्र अशा विविध गणितीय सूत्रांचा समावेश आहे . या बुकमार्क चा उपयोग पुस्तकात वाचलेल्या पानाची खूण म्हणून तर होईलच ,सोबत आकर्षक रितीने सजवलेले असल्याने विद्यार्थ्यांकडून सहज हाताळले जाऊन गणितीय सूत्रांचे वाचन, पाढ्याचे वाचन होईल. या प्रदर्शनास पालकांनी भेट देऊन विद्यार्थांचे कौतुक केले.