गोपालकाला उपक्रम:-
राधेची भक्ती बासरी ची गोडी,
यशोदा देवकी मैयामोरी,
श्रीकृष्ण सुदामाची मैत्री न्यारी,
लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांची रास,मिळून साजरा करू दहीहंडीचा दिवस…
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भारताचा महत्त्वाचा सण आहे.
या सणाला गोकुळाष्टमी असे ही म्हणतात.दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्व प्राथमिक विभागात दहीहंडी उपक्रम साजरा करण्यात आला शाळेच्या सभागृहात हंडी बांधण्यात आली. दोरीला काकडी,केळी बांधण्यात आली. मा मुख्याध्यापीका नमिता जोशी मॅडम यांनी हंडीचे पुजन केले व सुजाता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गोपाल काल्याची माहिती व गोष्ट सांगीतली.चिमुकले विद्यार्थी श्रीकृष्ण व विद्यार्थिनी राधा च्या पोशाखात आले होते चिमुकले राधाकृष्ण सगळ्यांचे लक्षवेधत होते.शेवटी सगळ्या श्रीकृष्णांनी मिळून हंडी फोडली. त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर फेर धरला.
https://photos.app.goo.gl/RsRqCVDin1xbRrA96