दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या….
आठवलं ना दिवाळीच गाणं…
पहिले शैक्षणिक वर्ष संपल्यावर दिवाळीच्या सुट्टीपूर्वी पूर्वप्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांची शाळेच्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन सभागृहात दि. २५/१०/२०२५ रोजी दिवाळी साजरी झाली. मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम सर्व सहाय्यक शिक्षिका व सेविका विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या. पूर्व प्राथमिक विभागात रांगोळी काढण्यात आली व दिवे लावण्यात आले. वसुबारस,धनत्रयोदशी नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन भाऊबीज दिवाळीच्या या पाच दिवसांची माहिती सहशिक्षिका सौ पाटील मॅडम व सहशिक्षिका सौ चारुता मॅडम यांनी दिली. सहशिक्षिका सोनाली मॅडम व सुजाता मॅडम यांनी दिवाळीच्या फराळाचे गाणे म्हटले. गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना मक्याचा चिवडा व नारळाची वडी फराळ म्हणून देण्यात आला.दिवाळी साजरी होऊन आत्ता दिवाळी च्या सुट्ट्या राहणार याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. असा हा दिवाळी हा प्रकाशाचा सण मोठ्या उत्साहात पूर्व प्राथमिक विभागात पार पडला.