*फडके विद्यालयात मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा*
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही *महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात २७ फेब्रुवारी मराठी दिन साजरा करण्यात आला*.
इ.५ते ९वी पर्यंतच्या सर्वच वर्गातून मुलांनी कार्यक्रमात भाग घेऊन मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन केले, मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी गाणी , पोवाडे, पिंगळा आपल्या दारी याचे सादरीकरण, मी सावित्री…याचे आत्मकथन ,बालगीत, संस्कृत देववाणी गीत, सांगा पाहू कोण?- प्रसिद्ध लेखन , कवितेच्या ओळी आणि कवी व लेखक त्यांची ओळख इत्यादी प्रकार हसत खेळत, विशेषत्वाने सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य प्रकार आत्मसात केले. कौतुकाची बाब म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता आठवी भास्कराचार्य वर्गातील चि. क्षितिज बोरसे या विद्यार्थ्याने केले. तसेच मराठी दिनाचे औचित्य साधून त्या विषयानुरूप शुभेच्छा कार्ड चि.ज्योती स्वरूप देशपांडे याने साकारले.
विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पालक प्रतिनिधी ची उपस्थिती महत्त्वाची ठरली ,तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण मॅडम उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भरभरून त्यांचे कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे हे आवर्जून त्यांनी संवाद साधताना सांगितले. तसेच आपण कुठेही गेलो तरी मराठीतच बोलले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.
https://photos.app.goo.gl/3oUF461JRmYtUghg8