दिनांक- २७ फेब्रुवारी २०२५
मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तिचा अभिमान बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. हा दिवस प्रसिद्ध मराठी साहित्यिक कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर ) यांच्या जयंतीनिमित्त तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेप्रति प्रेम वाढवण्यासाठी साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे मॅडम यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ. देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून देणारे प्रेरणादायी विचार मांडले . त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्य जपण्याचा संदेश दिला.विशेषतः PPT सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठी भाषा समजून घेण्याची अनोखी संधी मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सायली लोंढे मॅडम यांनी केले. यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वदिग्दर्शित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मराठी भाषेचा गोडवा आणि तिची श्रीमंती दर्शवणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये नृत्य, गीत गायन,प्रार्थना, समूहगीत, अशा अनेक कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर केले.
तसेच मराठी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका देवरे मॅडम तसेच पालक प्रतिनिधींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुषमा परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांची कविता वाचन करून करण्यात आला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मराठीचा अभिमान बाळगा, मराठीतून अभिव्यक्त व्हा.असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान वाटावा आणि तिच्या संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी हा उद्देश पूर्ण झाला. संपूर्ण कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला.