*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा*मराठी माध्यमिक विभाग

*फडके विद्यालयात ७५ वा संविधान दिन उत्साहात साजरा*
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सरकारकडे सुपूर्द करण्यात आले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांकडून संविधानाची उद्देशिका म्हणून घेण्यात आली.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी *भारतीय संविधान* विषयावर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यालयातील इतिहास शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली. संविधानाची रचना व त्याचे महत्व विशद केले. “जगातील सर्वात मोठ्या अश्या भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांनी आदर बाळगणे आवश्यक आहे.” असे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी सांगितले.
२६ नोव्हेंबर च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://photos.app.goo.gl/KXwHzr4Au7BhbAWKA

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’