मतदान जनजागृती अभियान मराठी माध्यमिक विभाग

मतदान जनजागृती अभियानांतर्गत म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय माध्यमिक विभाग -मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. १६ नोव्हेंबर रोजी विद्यालयाच्या परिसरात प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी उपस्थित राहून पथनाट्य व प्रभातफेरी च्या आयोजन व नियोजनासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,” मतदान हे नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. लोकशाहीला बळकटी देण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान करावे, हेच आवाहन आम्ही या प्रभातफेरी व पथनाट्याच्या माध्यमातून करीत आहोत.”

https://photos.app.goo.gl/J6xCj3bbeRBKDgoJ6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’