मोबाईल प्लॅनेटोरियम (तारांगण) प्रक्षेपण
दिनांक-१२/२/२०२५
म. ए. सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयामध्ये दिनांक १२ फेब्रुवारी२०२५ रोजी मोबाईल प्लॅनेटोरियम अर्थात तारांगण प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि आकाशगंगेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ, ग्रह, तारे, उपग्रह आणि आकाशगंगेची माहिती देण्यात आली तसेच खगोलशास्त्रातील संकल्पना प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात समजावून सांगण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी शाळेच्या सभागृहात एक मोठा तंबू किंवा गुंबजाकृती होल तयार करण्यात आला होता. त्यात 360° डिजिटल प्रोजेक्शनद्वारे आकाशगंगेची सफर घडवण्यात आली. विद्यार्थ्यांना आभासी आकाशगंगा, ग्रहांची गती, सूर्यग्रहण-चंद्रग्रहण यासारख्या घटना थ्री-डी स्वरूपात अनुभवायला मिळाल्या.
प्रक्षेपणामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता.
1. सौरमंडळातील ग्रह व त्यांची वैशिष्ट्ये.
2. आकाशातील विविध तारे व त्यांचे प्रकार.
3. खगोलीय घटनांचे थ्री-डी सादरीकरण.
4. कृत्रिम उपग्रह व त्यांचे महत्त्व.
विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम पाहिला.हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय रोचक व ज्ञानवर्धक ठरला. त्यांनी खगोलशास्त्राबद्दल नवीन संकल्पना शिकल्या आणि अंतराळ संशोधनाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांनीही हा उपक्रम शिक्षणासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
मोबाईल प्लॅनेटोरियम हा एक प्रभावी शिक्षणात्मक उपक्रम ठरला. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान व खगोलशास्त्र याबद्दल प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
https://photos.app.goo.gl/n7WLbU3umbzjGVeA8