राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. मराठी माध्यम

शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी TIFR चे ज्येष्ठ वैज्ञानिक मा. नरेंद्र देशमुख यांच्या शुभहस्ते फ़ीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा.देशमुख सरांनी आपल्या जीवनात सुद्धा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासला पाहिजे,आपल्या आयुष्याचे ध्येय कसे निश्चित केले पाहिजे,अभ्यास कसा करावा? अशा अनेक गोष्टींचा परामर्श घेत विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधला.
या प्रदर्शनात ५ वी ते ९ वी च्या *९७* विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्प सादर केले आहेत.प्रकाशीय उपकरणे ,पुली,हायड्रॉलिक जेसीबी, अन्न साखळी ,digestive system,functioning of lungs,types of tissues अशा प्रकारच्या अनेक प्रतिकृती तयार केल्या आहेत.या सर्व विद्यार्थ्यांचे मा.देशमुख सर,मुख्याध्यापिका मा.सोमण मॅडम तसेच इतर शिक्षक,पालक यांनी कौतुक केले.

https://photos.app.goo.gl/kVbdvspnWbLnHYYh7

Leave a Comment