शेकोटी अहवाल
दिनांक-७/२/२५
थंडीच्या दिवसांत कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गावोगावी शेकोटी पेटवली जाते याचे विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभव विद्यार्थ्यांना होण्यासाठी शेकोटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची आखणी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. सर्व कामाची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावर देण्यात आली. शुक्रवार दिनांक ७/०२/२०२५ रोजी सायंकाळी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सभागृहात एकत्रित करण्यात आले. सर्व पालकही उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी
स्वदिग्दर्शित कार्यक्रम सादर केले. यात नृत्य, नाटिका, पोवाडा, काव्य स्वयंप्रेरणेने सादर केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा कांडपिळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महत्त्व मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे यांनी केले .
नंतर सर्व विद्यार्थी व पालक यांना विद्यालयाच्या क्रीडांगणावर शेकोटीभोवती गोलाकारात उभे राहून प्रातिनिधिक स्वरूपात पुरुष पालकांच्या हस्ते शेकोटीचे प्रज्वलन करण्यात आले. शेकोटी गीतावर ताल धरून शेकोटी भोवती फेर धरला. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पौष्टिक खाऊ देण्यात आला. पालकांनी सदर दोन्ही कार्यक्रमांना उत्स्फूर्त व बोलका प्रतिसाद दिला . अशा प्रकारे शेकोटी हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.