संविधान दिन मराठी प्राथमिक विभाग

संविधान दिन
आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक म्हणून घडणार आहे .असा हा विद्यार्थी सुसंस्कृत व आदर्श घडविण्यासाठी त्यामध्ये संविधानाविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेची ओळख करून देण्यासाठी संविधान दिन विद्यालयात साजरा केला गेला.
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सभागृहात एकत्रित करून शिस्तबद्धरीत्या उभे राहून संविधान उद्देशिकेचे सामूहिक कथन करण्यात आले. सदर प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक ही वाचनात सहभागी झाले होते. प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ मनीषा कांडपिळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटने विषयी माहिती सांगितली तसेच संविधानाचे महत्त्वही स्पष्ट करून दिले.

https://photos.app.goo.gl/fYcKeQ1DEZ4S9CxD7

Leave a Comment