संस्कृत दिन

 

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी संस्कृत दिन उत्साहात साजरा केला.
संस्कृत दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून बालगीत , कथा , गीत गायन , भगवद्गीतेतील श्लोक व त्यांचे विवेचन केले तसेच अष्टलक्ष्मी स्तोत्रावर आधारित मनोहारी नृत्यही सादर केले.
तसेच संस्कृत दिनानिमित्त इ. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्लोक पठण स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण यांनी उपस्थितांना संस्कृत दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयात सुरू असणाऱ्या संस्कृत संभाषण तासिकेला विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन करावे असेही सांगितले. अशाप्रकारे विद्यालयात संस्कृत दिन अत्यंत अल्हाददायक वातावरणात संपन्न झाला.

https://photos.app.goo.gl/oUA9mCbeZTiipFJ18

Leave a Comment