दि १४नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर *बालदिन* म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो .
या दिनाचे औचित्य साधून म्हणून.ए.सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालकांचे भावविश्व उलगडणा-या कविताचे वाचन ( *काव्यवाचन* स्पर्धा) घेण्यात आली . यात विद्यार्थांनी उत्तम उत्तम कवितांचे वाचन केले . यात वि.दा. करंदीकर, बहिणाबाई चौधरी,गुरू ठाकूर अशा नामवंत कवीच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले . या स्पर्धेत २० विद्यार्थी सहभागी झाले होते.
इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी *बालदिन* भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू(चाचा नेहरू)यांच्या जयंतीनिमित्त बालगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या. स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .आणि खूप छान बालगीते सादर केली या स्पर्धेत ४८विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे परीक्षण सौ. प्रचिती तळवळकर व सौ. अंकिता थवई.यांनी केले.
https://photos.app.goo.gl/rF8jdeZbcxVKVjJL9