१५ जून शाळा प्रवेशोत्सव

गुरुवार दिनांक १५जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस रांगोळी, फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले. स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. त्यांना लेखणी भेटस्वरूप देण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ.सोमण मॅडम तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, माध्यमिक विभाग -मराठी माध्यम.
प्रवेशोत्सव
गुरुवार दिनांक १५ जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ,शाळा मातेस रांगोळी , फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले. स्वागताचे फलक लिहिले , आणि – ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले . त्यांना लेखणी भेट स्वरूप देण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा .सौ . सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केले ,तसेच त्यांना मार्गदर्शन केले.

https://photos.app.goo.gl/UifabkzbAaMRDDtv8

 

 

Leave a Comment

This will close in 20 seconds