म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
पनवेल,रविवार .दि २६ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक सोहळा पार पडला.
विद्यालयाच्या परंपरेनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. त्यानुसार श्री. व सौ. माळी. कु. अंतरा माळी (शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४). या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीच्या पालकांना यावर्षीच्या ध्वजारोहण समारंभास आमंत्रित करण्यात आले . सौ. सुगंधा माळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील ,भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेतील, क्रीडेची तसेच इतर बाह्य परिक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना विषयी भाषण केले.
७६व्या प्रजास्सत्ताक दिनानिमित्त फडके विद्यालयातील प्राथमिक विभागातील विदयार्थ्यांनी सूर्यनमस्कार, इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी घोष पथकाचे सादरीकरण केले. शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. विद्यालयाच्या सर्व विभागाचे पदाधिकारी,
( सौ समिता सोमण ,सौ निशा देवरे , सौ मनिषा महाजन .सौ. शितल साळुंखे, श्रीमती नमिता जोशी)मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी इत्यादींनी उपस्थितीत राहून ध्वजास मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी केले.