*फडके विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
विद्यालयाच्या २५ वर्षांच्या परंपरेनुसार इयत्ता १० वीत विद्यालयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. तिच परंपरा जपत यावर्षी हा सन्मान इंग्रजी माध्यमात सर्वप्रथम आलेल्या देवयानी शिंदे चे पालक श्री सुदेश व सौ. नंदिनी शिंदे यांना प्राप्त झाला.
ध्वजारोहणानंतर ध्वजगीत, राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे मा. श्री सुदेश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाचे आभार मानले. तसेच विद्यालयातील नाविन्यपूर्ण, संस्कारपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण ज्ञानप्राप्ती करण्याबाबत मार्गदर्शन केले. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी आपल्या संवादात उपस्थित विद्यार्थ्यांना “भारतापुढील समस्यांवर तुम्ही मुलांनी एक उत्तम उपाय म्हणून समोर यावे. आपल्या शाळेचे, पालकांचे आणि देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करा.” अश्या शब्दांत प्रोत्साहित केले. माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी आपल्या संवादात विद्यालयात सुरू असलेल्या कृतज्ञता निधी अभियानात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.
यासोहळ्यास विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षिका सुरेखा भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.