९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी माध्यमिक विभाग

*आज दि. १३ ऑगस्ट रोजी क्रांति दिनानिमित्त विद्यालयात इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नाट्यीकरणातून क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण केली.*
९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेल्या चले जाव आंदोलनाच्या घोषणेचे स्मरण म्हणून दरवर्षी ९ ऑगस्ट ला क्रांतिदिन साजरा केला जातो. आपल्या विद्यालयातील ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिरसा मुंडा सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सादर केले व त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी करावयाच्या क्रांती बाबत प्रेरीत केले.

https://photos.app.goo.gl/FcJ7iwcBBAJnX2m56

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’