मराठी नव वर्षाच्या स्वागतासाठी ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत विद्यालयातील माध्यमिक विभाग- मराठी माध्यमाचे ध्वज पथक, लाठी काठी पथक उत्साहात सहभागी झाले होते. पनवेलचे लाडके आमदार कार्यसम्राट मा. प्रशांत ठाकूर यांनी देखील विद्यालयाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला.