शिक्षक दिन [ प्राथमिक विभाग मराठी माध्यम ]

शिक्षक दिन
गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त म.ए.सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभागात शिक्षक दिनानिमित्त माननीय मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीचे विद्यार्थी हे एक दिवसीय शिक्षक व मुख्याध्यापक झाले होते .सर्व एक दिवसीय शिक्षकांनी इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचे हसत खेळत पद्धतीने अध्यापन कार्य संपन्न केले. शालेय व्यवस्थापन समिती ,सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा व सर्व पालक प्रतिनिधींनी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन एक दिवसीय मुख्याध्यापक कुमार मृगांक भूषण कुलकर्णी व मुख्याध्यापिका निशा देवरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व पालकांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच एक दिवसीय मुख्याध्यापक व एक दिवसीय शिक्षकांचे शुभेच्छा पत्रक, पुष्प देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.सोमण मॅडम व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. साळुंखे मॅडम यांचेही स्वागत करण्यात आले. सर्व एक दिवसीय मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वतःचे अनुभव गोड शब्दात व्यक्त केले .
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. देवरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ अनुजा दीक्षित यांनी केले. प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती , विशाखा समिती, सखी सावित्रीच्या तसेच शिक्षक पालक संघाचे सर्व प्रतिनिधींनी त्यांनी स्वतः तयार केलेल्या शुभेच्छा पत्रक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मुख्याध्यापिका निशा देवरे मॅडम व शालेय व्यवस्थापन च्या अध्यक्षा पूजा फुलारी यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2023- 24 मध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आभार मानून कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे फोटो  खालील लिंकवर पहा .

https://photos.app.goo.gl/Ro2X9RZE3r8bXqRk9

Leave a Comment