शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडला पूर्व प्राथमिक विभाग

*शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडला  :-*
ऐलोमा पैलोमा गणेश देवा।
माझा खेळ मांडीयेला करीन तुझी सेवा।।
हे गाणं ऐकलं की आठवतो तो भोंडला.अश्विन प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत जे देवीचे नवरात्र साजरे होते,त्या नऊ दिवसांत भोंडला साजरा करतात.हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करून फेर धरून विविध गाणी म्हणतात.असा हा भोंडला मराठी- इंग्रजी पूर्व प्राथमिक विभागात दिनांक ९/१०/२०२४ रोजी शाळेच्या डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास १५० महिला पालकांचा समावेश होता. मा.मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी हत्तीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर खेळेवाडीच्या महिला पालकांनी भोंडल्याची गाणी म्हणून भोंडल्याची सुरुवात केली. महिला पालक शिक्षक सेविका यांनी हत्ती भोवती फेर धरला .पालकांना खिरापत म्हणून चिक्की देण्यात आली.
पालकांनी विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आशा प्रकारे पारंपरिक संस्कृती जपणारा भोंडला पूर्व प्राथमिक विभागात आनंदाने साजरा करण्यात आला.

https://photos.app.goo.gl/FrDA9UVSJZeMkQZL9

 

Leave a Comment