मतदान जागरूकता अभियानांतर्गत प्रभात फेरी
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये मतदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि लोकशाही प्रक्रियेतील त्यांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्याकरिता दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते
प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या मैदानातून करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता तिसरी व चौथीचे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य आणि पोस्टर्स तयार केले होते. या पोस्टमध्ये’ मतदान हा आपला हक्क आहे ‘.,’ आपले मत महत्त्वाचे आहे ‘. असे संदेश होते प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी हे पोस्टर हातात धरून मतदानाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. सदर प्रभात फेरी शालेय परिसरात फिरवण्यात आली. त्यावेळी सदर विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती संदर्भात घोषवाक्यांचा जयघोष केला.
प्रभात फेरीचा समारोप शाळेच्या मैदानावर करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदानाच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे समजावून सांगितले.
मतदान जनजागृती प्रभात फेरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात मतदानाबद्दल जागरूकता वाढली.