राष्ट्रीय विज्ञान दिन
दिनांक- २८ फेब्रुवारी २०२५
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या शाळेमध्ये उत्साहात साजरा केला गेला. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे १९२८ मध्ये सर चंद्रशेखर वेंकट रमन यांनी केलेल्या “रमण परिणाम ” या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या निमित्ताने आमच्या शाळेत विविध वैज्ञानिक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे मॅडम यांनी सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सर सी. व्ही.रमण यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
यानंतर इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले वैज्ञानिक मॉडेल सादर केले गेले. सौर ऊर्जा,जलसंवर्धन, श्वसन प्रणाली मॉडेल, वॉटर फिल्टर, पर्यावरण पूरक तंत्रज्ञान यासारख्या संकल्पनांवर प्रयोग सादर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. सायली लोंढे मॅडम यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राची व्याप्ती आणि संशोधनाचे महत्त्व समजले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झाला आणि विज्ञानाची आवड वाढली. अशाप्रकारे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा उपक्रम अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.