वार्षिक स्नेहसंमेलन’रसरंग’मराठी माध्यम
*साहित्यातील नऊ रस आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न फडके विद्यालय करीत आहे.* पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या २६ व्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘रसरंग’च्या प्रमुख पाहुण्या व ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती सुनीता जोशी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या. उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी व्यासपीठावरून संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती …