क्षेत्रभेट- प्राथमिक मराठी

क्षेत्रभेट: गाढेश्वर मंदिर व परिसर

​विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाशी ओळख करून घेण्यासाठी
इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी गाढेश्वर येथील ४०० वर्षे जुन्या पुरातन महादेवाच्या मंदिरात क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात भगवान महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या ऐतिहासिक वास्तुकलेचे निरीक्षण केले. त्यानंतर शिक्षकांनी मंदिराच्या परिसरातील विविध वृक्षांची आणि औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. निसर्गरम्य वातावरणात सर्वांनी एकत्र बसून ‘वनभोजनाचा’ आनंद लुटला.
या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाची माहिती मिळाली, तसेच विविध झाडांची ओळख पटल्यामुळे त्यांच्यात निसर्गाप्रती आपुलकी निर्माण झाली. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरली.

Scroll to Top