आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सण आहे. या दिवसाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागात दिनांक २०२४/७/२०२६ रोजी आनंददायी आणि संस्कार मूल्य जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित राहिले होते; त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सहाय्यक शिक्षिका जान्हवी मॅडम यांनी आषाढी एकादशीची, सर्व विद्यार्थ्यांना छानशी छोटीशी गोष्ट सांगितली. खेळवाडीच्या छोट्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रखुमाईच्या पालखी समोर ताल धरून दंग झाल्या तसेच मोठ्या शिशुच्या विद्यार्थिनीने छानसा अभंग म्हटला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम" च्या गजराने वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर टाळाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. अशा प्रकारे सर्व शिक्षक-सेविका व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन हा सांस्कृतिक कार्यक्रम आनंदात साजरा केला.
शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२६ रोजी पूर्व-प्राथमिक विभागात पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला. या प्रकल्पामध्ये पावसातील निसर्गाचा देखावा तयार करून मांडण्यात आला होता, तसेच पावसात खेळल्या वरती आपण आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो डॉक्टरांकडे असणाऱ्या साहित्याची मांडणी करण्यात आली होती ,
अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना हा पावसाळा प्रकल्प दाखविण्यात आला. वर्गशिक्षकांनी प्रकल्पातील प्रत्येक घटकाची माहिती समजावून सांगून पावसाळ्याचे महत्त्व, निसर्गातील बदल आणि आरोग्याची काळजी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प बघण्यासाठी सर्व पालकांना सहभागी करण्यात आले होते, पालकांनी सुद्धा अभिप्राय देऊन पावसाळा प्रकल्पाचे कौतुक केले.
पितृ दिन (Father’s Day)
दि. २७/०६/२०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागात वडील दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व वडील पालकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमादरम्यान पालकांनी आपल्या पाल्यांसोबतच्या आठवणी व भावना व्यक्त केल्या.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांना प्रेमाची भेट म्हणून स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड अर्पण केले. तसेच वडील व विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे वडील व पाल्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ झाली. कार्यक्रम आनंददायी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभाग विभागात गुरुपौर्णिमा व मातृ-पितृ पूजन हा संस्कारमय कार्यक्रम दिनांक 29 जुलै 2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांच्या हस्ते व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व विद्यार्थी-शिक्षक व सेविकांनी गुरुवंदना व प्रार्थना करून करण्यात आली, तसेच सहाय्यक शिक्षिका तृप्ती मॅडम यांनी गुरुपौर्णिमेची सर्व विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्येच आपल्या आई-वडिलांचे औक्षण व पुष्पे अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
अशा प्रकारे या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांना गुरुंचे मार्गदर्शन व आई-वडिलांचे प्रेम यांचे महत्त्व समजले तसेच या उपक्रमामुळे मुलांमध्ये भारतीय संस्कृती, संस्कार व कृतज्ञता बळकट होण्यास मदत झाली.तसेच सर्व पालकांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले.
भारतीय संस्कृतीत दिवा हा प्रकाश,पवित्रता आणि सकारात्मकते चे प्रतीक मानला जातो. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी प्री-प्रायमरी विभागात बुधवार दिनांक १२/०८/२०२६ रोजी दीप- पूजन प्रकल्प साजरा करण्यात आला.
या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी आणलेल्या मातीचा, पितळेचा, चांदीचा, पंचमुखी दिवा, समई, दगडाचा दिवा, आकाश दिवा असे विविध प्रकारचे व रंगिबेरंगी सजविलेल्या दिव्यांची आरास करण्यात आली होती.
त्यानंतर मा. मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी सर्व दिव्यांचे हार व पुष्पें अर्पण करून पूजन केले व सर्व विद्यार्थी -शिक्षक, सेविका यांनी श्लोक म्हटला, सहाय्यक शिक्षिका सुजाता मॅडम यांनी दीप अमावस्येची सर्व विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितली.
सर्व पालकांनाही हा प्रकल्प पाहण्यासाठी बोलवण्यात आले होते त्यांनीही या प्रकल्पाचे खूप कौतुक केले हे त्यांनी दिलेल्या अभिप्रायातुन स्पष्ट दिसून आले.
पूर्व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांसाठी “एक दिवस पावसाचा” हा आनंददायी व शैक्षणिक उपक्रम उत्साहात घेण्यात आला. पावसाळ्याचे वातावरण, पावसाचे महत्त्व आणि पावसाळ्यातील निसर्गातील बदल यांची विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने ओळख करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी छत्री, रेनकोट, यांसारख्या पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची माहिती घेतली. तसेच कागदी होडी बनवणे, या कलात्मक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावसावर आधारित गाणी, कविता व गोष्टींचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि निसर्गाविषयी प्रेम विकसित होण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाची ओळख करून देण्यासाठी दिनांक १७/८/२०२६ रोजी पूर्व प्राथमिक विभागात 'नागपंचमी प्रकल्पाचे' आयोजन करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांची माहिती तसेच सापांचे निसर्गातील महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या प्रकल्पामध्ये नागाची चित्रे, माती पासून बनवलेले वारूळ, सापाची पूजा करणाऱ्या स्त्रिया, झाडावर झोके घेणाऱ्या मुली यांचे कटआउट्स व गवत लावून छानसा देखावा तयार करण्यात आला होता. मा.मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम व सर्व शिक्षक-सेविकांनी वारुळाचे पूजन केले. तसेच सापांना त्रास न देता त्यांचे संरक्षण करणे आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि भारतीय संस्कृतीविषयी आदर निर्माण होण्यास मदत झाली.
पालकांना सुद्धा हा प्रकल्प खूप आवडला हे त्यांनी दिलेल्या अभिप्रायातून समजले.
































