मंगळवार दि. ८/०४/२०२५ रोजी पूर्व प्राथमिक विभागाचा शेवटचा दिवस एक आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांसाठी भेळ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणे,त्यांना सामाजिक सहभागाची जाणीव करून देणे आणि सहकार्याची भावना विकसित करणे हा होता. भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जसे की कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, मुरमुरे,फरसाण हे प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना आणण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतः घरून शोधून वस्तू आणण्याचा आनंद मिळाला व त्यांची नावे कळाली.ह्यामध्ये भाषा विकास होण्यास मदत झाली.भेळीसाठी लागणारे साहित्य एकत्र करून सर्व विद्यार्थी, सेविका आणि शिक्षकांनी भेळ तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी डब्यात भेळ घेऊन एकत्र भेळ खाण्याचा आनंद लुटला. हा दिवस मुलांसाठी केवळ एक खाद्योपक्रम नसून एक आनंददायी अनुभव होता. तसेच विद्यार्थ्यांनी रंगीत कपडे घातले होते ,नंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात नेऊन त्यांच्या आवडीची जसे की फळे, फुले,प्राणी, पक्षी आणि कृष्णाची गाणी लावून विद्यार्थी मनमुराद नाचत होते.

