गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’ प्राथमिक विभाग मराठी माध्यम

गोपाळकाला निमित्त ‘पुस्तक दहीहंडी’

विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी गोपाळकाला निमित्त विशेष पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले.  ही हंडी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध फळभाज्या, फळे तसेच पुस्तकांनी सजवली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर होण्यासाठी विशेष पुस्तकांची हंडी तयार करण्यात आली . या हंडीमध्ये विश्वकोश संत महात्मा यांच्या कथा संग्रह बोधपर कथा अशा अनेक पुस्तकांचा समावेश होता. सर्व विद्यार्थी रंगीत तसेच राधा कृष्णाच्या पोशाखात सभागृहात उपस्थित होते.
सभागृहात पुस्तक दहीहंडी लावण्यात आली. हंडीत दही काल्याच्या खाऊ ऐवजी सुविचार वृद्धिंगत करणारा खाऊ ठेवण्यात आला . विविध पुस्तकांची नावे व त्यांचे लेखन करणाऱ्या लेखकांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या.
मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे यांनी विद्यार्थ्यांना गोपाळकाला विषयी माहिती सांगितली. तसेच पुस्तकांचे आपल्या जीवनातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ. निशा देवरे मॅडम व प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थी प्रतिनिधी सह पुस्तक हंडीचे पूजन केले. यानंतर सर्व मुलांनी हंडीभोवती फेर धरला. जसे दहीहंडीतील दहीकाल्यामुळे शरीर सुदृढ बनते. तसेच या पुस्तक दहीहंडीने विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिगत व्हावे या अनुषंगाने शिक्षकांच्या मदतीने सर्व बाळगोपाळांनी हंडी फोडण्याचा आनंद घेतला. हंडी फोडल्यानंतर पुस्तकांचे नाव व लेखकांचे नाव यांच्या चिठ्ठ्या वेचण्यात आल्या नंतर मिळालेल्या प्रत्येक चिठ्ठीवरील पुस्तकाचे नाव व त्या पुस्तकाच्या लेखकाच्या नावाचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.    पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांची आकर्षण ठरली. अशाप्रकारे आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला .

https://photos.app.goo.gl/7ET955Gc9pPX9YQR7

Leave a Comment