‘स्वच्छ सुंदर सुरक्षित व पर्यावरण पूरक शाळा स्पर्धा’
(प्राथमिक विभाग) शिक्षणाबरोबरच स्वच्छता , नीटनेटकेपणा आणि शिस्त अशा संस्कारातून भविष्यातील सुजाण व जबाबदार नागरिक घडवीत असताना त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्या शाळेच्या आवाराची स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता, सुशोभीकरण , पर्यावरण, पूरकता या दृष्टीने संरक्षण व संवर्धन करण्यासाठी केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल मराठी माध्यम माध्यमास संस्थेतर्फे आयोजित स्वच्छ सुंदर सुरक्षित व पर्यावरण पूरक शाळा स्पर्धेत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ‘उत्तेजनार्थ’ पारितोषिक प्राप्त केले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विद्यालयास सन्मानित करण्यात आले.




