आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

म. ए. सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता १० वी  इंग्रजी माध्यमातील  प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याचे पालक मा. श्री. उमेश जाधव व सौ. उषा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘ तंबाखूमुक्त अभियान 3.0’ अंतर्गत व्यसनमुक्तीची   प्रतिज्ञा घेऊन जनजागृतीचा  संदेश दिला. विद्यार्थ्यांनी ‘सबसे ऊँची विजय पताका’ हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.

इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापिका तसेच प्रमुख पाहुणे मा . श्री. उमेश जाधव सर व सौ. वंदना जाधव यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी  देशभक्ती, राष्ट्रप्रेम व देशाप्रती असलेल्या आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माननीय  सौ. मनिषा महाजन मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांची विक्री करण्यात आली. या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त व भरभरून प्रतिसाद दिला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

Scroll to Top