दीप अमावस्या उत्साहात साजरी : माध्यमिक विभाग -मराठी माध्यम

दीपोत्सव उत्साहात साजरा 🪔
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला सुंदर व्यासपीठ मिळाले.
दीपोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गाच्या परिसराची विविध प्रकारच्या दिव्यांनी, पणत्या, पानाफुलांनी आणि आकर्षक सजावटीने सुंदर सजावट केली. पर्यावरणपूरक सजावटीला विशेष महत्त्व देत विद्यार्थ्यांनी नैसर्गिक साहित्याचा वापर केला. प्रत्येक वर्गाच्या दारासमोर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक फुलांच्या रांगोळ्या काढल्या.
विद्यार्थ्यांनी दीपोत्सवाचे महत्त्व सांगणारी विविध चित्रे व माहितीने उत्कृष्ट अशा पद्धतीने पॅनेल बोर्ड सजवले. प्रत्येक वर्गाची सजावट एकमेकांपेक्षा वेगळी आणि मनमोहक होती. तसेच विद्यार्थ्यांनी “तमसो मा ज्योतिर्गमय” हा प्रेरणादायी श्लोक म्हणत अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा सुंदर संदेश दिला.
या उपक्रमामुळे संपूर्ण शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि प्रकाशाने उजळून निघाले. विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे केलेली मेहनत, कल्पकता आणि पर्यावरणपूरक सजावट यामुळे दीपोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय ठरला.

Scroll to Top