(माध्यमिक विभाग- मराठी माध्यम)
शनिवार ,दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन) साजरा करण्यात आला .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सोमण मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच “सूचना फलकांचे सुशोभीकरण स्पर्धा”याचे आयोजन करण्यात आले. याकरिता सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय ,त्यांचे अमूल्य योगदान, त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा, व लिहिलेली ग्रंथसंपदा आणि “बालिका दिना” विषयी माहिती असणाऱ्या लेखांनी व चित्रांनी वर्गनिहाय सूचना फलकांचे सुशोभीकरण करण्यात आले.






