राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती सोहळा[ प्राथमिक मराठी ]

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती सोहळा

​दिनांक: १२ जानेवारी २०२६

​आजच्या तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्या शौर्याची, संस्कारांची व धैर्याची ओळख करून देणे, तसेच स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून राष्ट्रप्रेम आणि ध्येयनिष्ठा जागृत करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. स्त्रीशक्ती आणि युवाशक्ती यांचा जागर करण्याच्या हेतूने या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांडपिळे मॅडम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी कार्यक्रमाची सविस्तर प्रस्तावना केली. आपल्या भाषणातून त्यांनी दोन्ही महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला व विद्यार्थ्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचे आवाहन केले. प्रतिमा पूजनानंतर प्रज्ञा चोरघे मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. शिवरायांना घडवण्यात जिजाऊंचा असलेला मोलाचा वाटा आणि त्यांचे संस्कार यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर, रोहिणी कांबळे मॅडम यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबद्दल माहिती व त्यांच्या लहानपणीची एक छोटीशी गोष्ट सांगितली. विवेकानंदांचा ‘उठा, जागे व्हा…’ हा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिला.इयत्ता चौथीमधील काही विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलची माहिती प्रभावीपणे मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी सायली लोंढे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि प्रेरणादायी वातावरणात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ​हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे बीज पेरण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला.

Scroll to Top