गुरुपोर्णिमा ( माध्यमिक विभाग- मराठी माध्यम )

( माध्यमिक विभाग -मराठी माध्यम )
गुरुपौर्णिमा

बुधवार दि. २९/७/२०२६ रोजी विद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.पाटील मॅडम यांच्या हस्ते महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर इयत्ता ७वी व ८वीच्या विद्यार्थ्यांनी
“गुरुने दिला ज्ञानरूपी वसा”या गाण्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय केले,तसेच गुरूंचे महत्त्व सांगणारे भाषण इयत्ता ९वी मधील श्रेया पाटोळे या विद्यार्थिनींने केले.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः…” या श्लोकाचे सामूहिक पठण करण्यात आले.
मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर करावा, त्यांच्याकडून ज्ञान घेऊन उत्तम नागरिक बनावे, असा संदेश दिला. ” *गुरुवंदन छात्र अभिनंदन”.. या उपक्रमांतर्गत
भारत विकास परिषदेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात शिक्षकांचे व निवडक विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .स्वाती बापट यांनी केले,तर आभार मा. मुख्याध्यापिका रचना पाटील यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Scroll to Top