गुरुपौर्णिमा उपक्रम
||गुरू ब्रम्हा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म,तस्मै श्री गुरवे नमः||
विद्यार्थ्यांना गुरुचे चे महत्व कळावे म्हणून शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दि. १०/०७/२०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
माननीय मुख्याध्यापिका नमिता जोशी यांनी महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन
केले व विद्यार्थ्यांकडून श्लोक म्हणून घेतला.
सहा.

शिक्षिका सोनाली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना अरुणीची गुरुभक्ती ही गोष्ट सांगितली.
प्रत्येक बालकांचा पहिला गुरु त्यांचे माता पिता असतात. त्यांच्या प्रतिकृताज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा निमित्त मातृ पितृ पूजन उपक्रम साजरा करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पालकांचे पूजन करण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांकडून संस्काराचा वारसा जपण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.


