पावसाळा प्रकल्प
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा…
पैसा झाला खोटा..
पाऊस आला मोठा…
हे गाणं चिमुकल्यांचे फार आवडीचं. हाच आनंद द्विगुणीत करण्याकरता पूर्व प्राथमिक विभागात सर्व शिक्षक व सेविकांनी मिळून दि.१६/७/२५ रोजी पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला.या प्रकल्पामध्ये कापसाचा वापर करून धबधबा बनवण्यात आला. तसेच इंद्रधनुष्य ,विहीर, झाडे ,शेती, चिखलात खेळणारी ,मुले ,घर, शेतातील अवजारे ,प्राणी, पक्षी, रेनकोट ,छत्री दाखवण्यात आले. तसेच पावसात जास्त भिजल्यामुळे आजारी पडल्यावर प्रथमोपचार पेटी ,परिचारिका, ॲम्बुलन्स ,डॉक्टरांचे साहित्य यांचे कट आउट दाखवण्यात आले. तसेच मोठा शिशु व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पासाठी कागदाच्या होड्या बनवून आणल्या होत्या.
शिक्षकांनी आपल्या वर्गातील मुलांना प्रकल्प दाखवून माहिती सांगितली. तसेच हा
प्रकल्प पाहण्यासाठी पालक वर्ग ही उपस्थित राहिले.
अशाप्रकारे पालकांना व विद्यार्थ्यांना हा प्रकल्प खूप आवडला. हे पालकांनी
दिलेल्या अभिप्रायातून दिसून आले.


