गुरुपौर्णिमा
दिनांक-१०-७-२०२५
गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा
अशा गुरूंच्या पूजनाचा पवित्र दिवस — गुरुपौर्णिमा
विद्यार्थ्यांमध्ये गुरू आणि पालकांविषयी आदरभाव निर्माण करणे, तसेच त्यांना संस्कारक्षम बनवणे. याकरिता गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात सभागृहात सर्व पालकवर्गाच्या उपस्थितीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा कांडपिळे मॅडम यांनी अतिशय खेळीमेळीच्या पद्धतीने केले. त्यांच्या सहज संवादशैलीमुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक आकर्षक बनला.
सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापिका देवरे मॅडम आणि पालक प्रतिनिधींच्या हस्ते गुरुवर्य व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करत कार्यक्रमाला सुरेल सुरुवात केली.
मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गुरुपौर्णिमेचे महत्त्व, शाळेतील संस्कारक्षम शिक्षणपद्धती व शिक्षकांचे योगदान यावर प्रकाश टाकला. त्यानंतर काही पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांकडून अत्यंत आदरपूर्वक मातृ-पितृ पूजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी कृतज्ञता आणि प्रेमाची भावना निर्माण झाली.
हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपात सर्व उपस्थितांना पौष्टिक लाडू देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, आणि संस्मरणीय असा ठरला.












