आषाढी एकादशी

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।।
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल…..
विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व कळावे या उद्देशाने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात
दि. ४ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली .
सर्व शिक्षक व सेविकांनी सजवलेल्या पालखीत विठ्ठलाची प्रतिमा ठेवून, माननीय मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी , विठ्ठल व रखुमाई चा वेश परिधान केलेल्या, विद्यार्थ्यांसह पालखीचे पूजन केले . तसेच खेळवाडी .,छोटा शिशु, मोठा शिशु च्या विद्यार्थ्याने वारकरी पोशाख परिधान केला होता .
सह-शिक्षिका मनीषा पाटील मॅडम, यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची छान गोष्ट सांगितली.

नंतर शाळेच्या सभागृहामध्ये शिक्षक व सेविकांसोबत वारकरी पोशाखातील विद्यार्थ्यांनी पालखीसोबत विठ्ठलाचा गजर करत दिंडी काढण्यात आली .
विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून पौष्टिक असा राजगिरा लाडू देण्यात आला.
अशाप्रकारे शाळेच्या सभागृहात छोटेसे पंढरपूर अवतरले होते.

Scroll to Top